Kalyan : कल्याण-डोंबिवलीकरांचा रविवार वाहतूककोंडीमध्येच.. सर्व महत्वाच्या मार्गावर नेहमी ट्रॅफिक

रविवारची सुट्टी आणि शहराबाहेर जाणाऱ्या नागरिकांची वाढलेली वर्दळ यामुळे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला आणि लालचौकी परिसर रविवारी दुपारपासून मोठ्या वाहतूक कोंडीत अडकला. या कोंडीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेची वाहने, सार्वजनिक बस आणि मालवाहू वाहनांनाही बसला. वाहतूक कोंडी वाढत असताना वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर
कल्याण : रविवारची सुट्टी आणि शहराबाहेर जाणाऱ्या नागरिकांची वाढलेली वर्दळ यामुळे कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ला आणि लालचौकी परिसर रविवारी दुपारपासून मोठ्या वाहतूक कोंडीत अडकला. या कोंडीचा फटका सर्वसामान्य प्रवाशांसह रुग्णवाहिका, अत्यावश्यक सेवेची वाहने, सार्वजनिक बस आणि मालवाहू वाहनांनाही बसला. वाहतूक कोंडी वाढत असताना वाहतूक पोलिसांचे योग्य नियोजन नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाल्याची टीका प्रवाशांकडून करण्यात येत आहे. कल्याण शहरात भिवंडी, पडघा-गांधारी, शिळफाटा आणि अहिल्यानगर-मुरबाड मार्गे मोठ्या प्रमाणात वाहने येतात. याच मार्गाने ही वाहने शहराबाहेरही जातात. शहरात येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी उपलब्ध असलेले मार्ग मर्यादित असल्याने या मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक असते.
रविवारी दुपारपासून दुर्गाडी किल्ला परिसरात वाहनांची गर्दी वाढण्यास सुरुवात झाली. हळूहळू ही कोंडी लालचौकी, खडकपाडा, पडघा-गांधारी मार्ग, शिळफाटा मार्ग आणि शिवाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यांपर्यंत पोहोचली. एका मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्यास सुरुवात केली. त्यामुळे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही वाहनांची संख्या वाढली आणि ते रस्तेही कोंडीत अडकले. दुर्गाडी किल्ला परिसरातील भवानी चौकात वाहतूक सुरळीत करण्यास विलंब झाल्याने परिस्थिती आणखी बिकट झाली. या कोंडीचा परिणाम गोविंदवाडी बाह्यवळण रस्ता, लालचौकी आणि खडकपाडा रस्ता या परिसरावरही झाला.
प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, भवानी चौकात काही मिनिटांसाठी वाहतूक थांबली तरी दुर्गाडी किल्ल्याच्या चारही बाजूंना वाहनांच्या रांगा लागण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा महत्त्वाच्या चौकात वाहतुकीचे नियोजन आणि नियंत्रण वेळेत होणे गरजेचे असल्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. लालचौकी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानंतरही रस्त्यावर वाहतूक पोलिसांची पुरेशी उपस्थिती दिसत नसल्याची तक्रार प्रवाशांनी केली. काही जागरूक नागरिक स्वतः रस्त्यावर उतरले आणि वाहनांना थांबवून इतर वाहनांना मार्ग करून देण्याचा प्रयत्न करत होते. लालचौकी आणि दुर्गाडी किल्ला परिसरात सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहतूक पोलीस कर्तव्यावर असतात. असे असतानाही रविवारी एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंडी झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रविवार असल्याने अनेक नागरिक ठाणे आणि नवी मुंबईतील व्यापारी संकुलांमध्ये खरेदी करण्यासाठी तसेच विविध घरगुती आणि उत्सवी कार्यक्रमांसाठी वाहनाने बाहेर पडले होते. मात्र अचानक वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे कुटुंबासह प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. खासगी प्रवासी वाहने, मालवाहू अवजड वाहने आणि सार्वजनिक बसही या कोंडीत अडकल्या. शहरातील महत्त्वाच्या मार्गांवर अशा प्रकारे वाहतूक ठप्प होत असल्याने आपत्कालीन सेवांच्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग आणि प्रभावी वाहतूक नियोजनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सुट्टीच्या दिवशीही जर कल्याण शहरातील प्रमुख रस्ते तासन्तास कोंडीत अडकत असतील, तर वाहतूक व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन नियोजन कधी होणार? हा प्रश्न आता कल्याण-डोंबिवलीकरांकडून उपस्थित केला जात आहे.

Vikrant Nalawade
Editorial
Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.
Join Do Reports WhatsApp Channel
ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा
Latest Stories

जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

Preity zinta । फक्त ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्ट घालून चालणार नाही; प्रत्यक्ष काम करा
जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

परंपरेतून आधुनिक लक्झरीकडे… SCube Salon फक्त सेवा नाही तर देतोय सौंदर्याचा अनुभव

