Do Reports

परंपरेतून आधुनिक लक्झरीकडे… SCube Salon फक्त सेवा नाही तर देतोय सौंदर्याचा अनुभव

DR
By Do Reports Desk
परंपरेतून आधुनिक लक्झरीकडे… SCube Salon फक्त सेवा नाही तर देतोय सौंदर्याचा अनुभव

२६ वर्षांचा कौटुंबिक अनुभव, वैयक्तिक सल्लामसलत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा मेळ; ग्राहकाच्या गरजा समजून घेण्यावर SCube Salonचा भर

डोंबिवली | DO Reports

सलूनमध्ये गेल्यानंतर आपल्याला नेमकी कोणती सेवा घ्यावी, कोणता हेअरकट आपल्याला सूट होईल किंवा त्वचेसाठी कोणती ट्रीटमेंट योग्य ठरेल, याचा अनेकदा संभ्रम असतो. अशावेळी केवळ सेवा देण्यापेक्षा आधी ग्राहकाला समजून घेणारा अनुभव अधिक महत्त्वाचा ठरतो. याच विचारातून SCube Salon ही संकल्पना आकाराला आली आहे. SCube Salonकडे पाहताना हे केवळ हेअर, स्किन किंवा ग्रूमिंग सेवा देणारे सलून म्हणून पाहिले जात नाही. ग्राहकाच्या गरजा, जीवनशैली, व्यक्तिमत्त्व आणि अपेक्षा समजून घेत त्याला योग्य सौंदर्यविषयक मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न येथे केला जातो.
“ग्राहकांनी फक्त सलूनमध्ये यावं आणि एखादी सेवा निवडावी, एवढंच आम्हाला अपेक्षित नाही. त्यांच्यासाठी नक्की काय योग्य आहे, हे त्यांना समजावं,” हा SCube Salonच्या कामामागचा महत्त्वाचा विचार आहे. असं या सलूनचे मालक साईराज मोरे यांनी सांगितले.
यामुळे कोणतीही सेवा किंवा उत्पादन सुचवण्यापूर्वी ग्राहकाच्या वैयक्तिक गरजा समजून घेण्यावर भर दिला जातो. केस, त्वचा, ग्रूमिंग किंवा ब्युटी ट्रीटमेंट असो, प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते, हे लक्षात घेऊन सल्ला देण्याचा प्रयत्न येथे केला जातो.

घरातून मिळालेली सौंदर्य क्षेत्राची शिदोरी

SCube Salonच्या या प्रवासामागे एक मजबूत कौटुंबिक पार्श्वभूमी आहे. सौंदर्य क्षेत्रात तब्बल २६ वर्षांचा अनुभव असलेल्या आईची साथ आणि या क्षेत्राशी व्यावसायिकरित्या जोडलेल्या पत्नीचा सहभाग यामुळे या व्यवसायाला अनुभवाची आणि कौशल्याची भक्कम जोड मिळाली आहे.
संस्थापकाचा स्वतःचा प्रवासही या संकल्पनेला आकार देणारा ठरला. मॉडेलिंगपासून हेल्थ कोचिंग आणि त्यानंतर सलून उद्योजकतेपर्यंतच्या प्रवासात सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्व यांचा एकमेकांशी असलेला संबंध अधिक जवळून समजला. त्यातून सौंदर्य म्हणजे केवळ बाह्य रूप नसून आत्मविश्वास, आरोग्य आणि स्वतःला सादर करण्याच्या पद्धतीशीही त्याचा संबंध आहे, ही विचारसरणी विकसित झाली.

सलूनमध्ये येणाऱ्या ग्राहकाला फक्त सेवा देऊन परत पाठवण्याऐवजी त्याला काही काळ स्वतःसाठी देता यावा, यासाठी वातावरणालाही महत्त्व देण्यात आले आहे. आलिशान आणि आरामदायी वातावरणासोबतच तज्ञांकडून वैयक्तिक लक्ष, योग्य सल्ला आणि सलूनमधून बाहेर पडल्यानंतरही आपला लूक कसा टिकवता येईल याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन देण्यावर भर दिला जातो. आज ‘लक्झरी सलून’ म्हटलं की प्रीमियम उत्पादने, आकर्षक इंटिरियर किंवा महागड्या सेवा डोळ्यासमोर येतात. मात्र SCube Salonची लक्झरीची व्याख्या थोडी वेगळी आहे. ग्राहकाला आपली गरज समजून घेणारा तज्ञ मिळणे, योग्य पर्याय सांगितला जाणे, स्वतःसाठी वेळ मिळणे आणि आत्मविश्वासाने सलूनमधून बाहेर पडणे, हा लक्झरी अनुभवाचा महत्त्वाचा भाग असल्याचे SCube Salonच्या संकल्पनेतून दिसून येते.

२६ वर्षांच्या कौटुंबिक अनुभवाची शिदोरी, आधुनिक कौशल्ये आणि वैयक्तिक सौंदर्य सल्लामसलत यांचा मेळ घालत SCube Salon आपली वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. इथे सौंदर्याला केवळ एका प्रक्रियेच्या स्वरूपात न पाहता, प्रत्येक व्यक्तीला काय योग्य आहे हे समजून घेण्यापासून अनुभवाची सुरुवात केली जाते. त्यामुळे SCube Salonचा प्रवास हा पारंपरिक सलूनच्या चौकटीपलीकडे जाऊन आधुनिक आणि वैयक्तिक सौंदर्य अनुभव देण्याच्या दिशेने सुरू आहे.

संबंधित विषय (Tags):
#salon#dombivli#business story#spa#fashion
Share This Article (बातमी शेअर करा):
DR

Do Reports Desk

Special Correspondent | Do Reports

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel