वैतरणा स्थानकावरील विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; खासदार डॉ. सवरा यांची पाहणी

काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लहान मुले रेल्वे रुळांवरून जीव मुठीत धरून चालताना दिसत होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार डॉ. सवरा यांनी वैतरणा स्थानकात जाऊन विद्यार्थ्यांशी, पालकांशी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला.
संदिप साळवे, पालघर
पालघर : वैतरणा रेल्वे स्थानक परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडून प्रवास करावा लागत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लहान मुले रेल्वे रुळांवरून जीव मुठीत धरून चालताना दिसत होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन खासदार डॉ. सवरा यांनी वैतरणा स्थानकात जाऊन विद्यार्थ्यांशी, पालकांशी तसेच स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. दररोज शिक्षणासाठी ये-जा करताना विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध नसल्याने धोकादायक परिस्थितीचा सामना करावा लागत असल्याची व्यथा नागरिकांनी त्यांच्यासमोर मांडली.
यावेळी खासदार डॉ. सवरा यांनी रेल्वे प्रशासन व पोलिस विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. शालेय विद्यार्थ्यांसाठी तातडीने सुरक्षित मार्गाची व्यवस्था करण्यासह आवश्यक उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
पालघर मतदारसंघातील नागरिकांच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी भूमिका डॉ. सवरा यांनी मांडली. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघेपर्यंत प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
संदीप साळवे
Special Correspondent | Do Reports
Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.
Join Do Reports WhatsApp Channel
ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा
Latest Stories

जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

Preity zinta । फक्त ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्ट घालून चालणार नाही; प्रत्यक्ष काम करा
जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

परंपरेतून आधुनिक लक्झरीकडे… SCube Salon फक्त सेवा नाही तर देतोय सौंदर्याचा अनुभव

