Do Reports

वडोली ते चालतवड रस्त्याची चाळण; तीन ते चार फुटांच्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

DR
By Do Reports Desk
वडोली ते चालतवड रस्त्याची चाळण; तीन ते चार फुटांच्या खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका

या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनांचे नुकसान होत असून, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खंबाळा ते जव्हार दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे.

जव्हार, दि.१; प्रतिनिधी

जव्हार: जव्हारला दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाशी जोडणाऱ्या वडोली ते चालतवड मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे, ठिकठिकाणी पडलेल्या तीन ते चार फुटांच्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे वेळीच रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी जव्हार तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. नुकतेच दाभोसा येथील काचेच्या पुलाच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर जव्हार ते दाभोसा मार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्यात आले होते. मात्र, दाभोसा ते खंरंबा आणि चालतवडपर्यंतच्या रस्त्यावरील खड्ड्यांकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी ‘व्हीआयपी दौऱ्यासाठीच रस्त्यांची दुरुस्ती होते का?’ असा सवाल उपस्थित केला आहे. या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे चारचाकी वाहनांचे नुकसान होत असून, दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खंबाळा ते जव्हार दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. चालतवड येथील गाडगे महाराज आश्रमशाळेजवळ सलग मोठे खड्डे पडले असून, पावसाचे पाणी साचल्यानंतर त्यांची खोली लक्षात येत नसल्याने अपघात वाढले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जव्हार कार्यालयासमोर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

“वडोली ते चालतवड हा अत्यंत महत्त्वाचा आंतरराज्य जोडमार्ग असूनही त्याची झालेली दुरवस्था गंभीर आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळण्यापेक्षा सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी. अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”

चित्रांगण घोलप,तालुका संघटक शिवसेना

संबंधित विषय (Tags):
#palghar#jawhar#road #accident
Share This Article (बातमी शेअर करा):
DR

Do Reports Desk

Special Correspondent | Do Reports

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel