खा.सुनिल तटकरे यांच्या पाठपुराव्याने पेण रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार

खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्याने पेण रेल्वे स्थानकाचा सुमारे ६३ कोटी रुपयांच्या निधीतून कायापालट होणार आहे. अद्ययावत रेल्वे स्थानकासोबत रिक्षा, दुचाकी व चारचाकी पार्किंग, प्लॅटफॉर्म सुशोभीकरण, उद्यान आणि इतर अत्याधुनिक सुविधा उभारण्यात येणार असून, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कामाला सुरुवात होण्याचे संकेत देण्यात आले आहेत.
कोकणातील मध्य रेल्वेचे दुसरे स्थानक असलेले पेण रेल्वे स्थानक अद्ययावत होत असून, येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय विमानतळासारखे हे स्थानक उभारी घेत आहे. सध्या या रेल्वे स्थानकाची अवस्था दयनीय असल्याचे चित्र आहे. पेण नगरपालिका आणि पेणमधील प्रवासी यांच्या अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता होताना दिसत आहे. आज दुपारी पेण रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावीत नूतनीकरणाच्या आणि विकासकामांची खा. सुनील तटकरे यांनी रेल्वे अधिकारी आणि पेण नगरपरिषदेचे नगरसेवक यांच्या समवेत पेण नगरपालिकेच्या सभागृहात रेल्वे अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रस्तावित नव्या सुसज्ज अशा रेल्वे स्थानकाचा प्रात्यक्षिक रेल्वे प्रशासनाकडून सादर करण्यात आला.
यावेळी नगराध्यक्ष प्रीतम पाटील, उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील, सभापती कलावती पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दयानंद भगत, जितेंद्र ठाकूर, यांच्यासह पेण नगरपरिषद सभापती, नगरसेवक, रेल्वेचे अधिकारी, राष्ट्रवादी,भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मध्य रेल्वेवरील पनवेल रेल्वे स्थानकानंतर पेण हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. त्यांनी यावेळी पेण रेल्वे स्थानकाचा परिसर अद्यावत होणार असून आंतरराष्ट्रीय विमानतळासारखे हे रेल्वे स्थानक असणार असल्याचे सांगितले. तर या ठिकाणी लांब पल्ल्याच्या गाड्या तांत्रिक अडचणी नुसार कठीण असले तरी प्रयत्न केले जातील, मात्र पेण रेल्वे स्थानकात मेमु रेल्वे फेऱ्यांवर जास्तीत जास्त भर दिला जाईल असे आश्वासन खा. तटकरे यांनी उपस्थितांना दिले.
पेण रेल्वे स्थानक अद्यावत होणार असून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले गणपती मुर्ती याचा विचार करून या संकल्पनेवर हे रेल्वे स्थानक विकसित करण्यात येणार आहे. रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच गणपती बाप्पाची ओळख म्हणून बाप्पाच्या मूर्तीची उभारणी देखील करण्यात येणार आहे.यासाठी संकल्पना तयार करण्याची संबंधितांना सूचना खासदार सुनील तटकरे यांनी दिल्या.
यावेळी रेल्वे स्थानक कशा पद्धतीचे असणार आहे याचे प्रात्यक्षिक छायाचित्र दाखवण्यात आले.तसेच पेण शहराला लागून असणाऱ्या रामवाडी येथे जाण्यासाठी मुंबई गोवा महामार्गाचा पदचार्यांना तसेच वाहनचालकांना वापर करावा लागत आहे. मात्र हा प्रवास धोकादायक असल्यामुळे पेण पासून रामवाडी पर्यंत रेल्वे रुळावरून पूल उभारण्याच्या नागरिकांच्या मागणीनुसार उपनगराध्यक्ष निवृत्ती पाटील आणि नगरसेवक निळकंठ म्हात्रे यांच्याकडून खा. सुनिल तटकरे आणि रेल्वे अधिकाऱ्यांसमोर या पुलाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. यावेळी खा. सुनील तटकरे आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद या प्रस्तावाला दिला गेला.
रेल्वे स्थानकाच्या उभारणीसाठी 63 कोटी रुपयांचा निधी
कोट्यवधी रुपये खर्चून होणाऱ्या पेण रेल्वे स्थानकाच्या अद्ययावत करण्यामध्ये स्वतंत्र रिक्षा पार्किंग, टू व्हीलर पार्किंग, फोरव्हीलर पार्किंग, पेण रेल्वे स्थानक सुशोभिकरण, प्लॅटफॉर्म सुशोभिकरण,तिकीटघर, स्वागतकक्ष ,उद्यान असणार आहे. संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर अद्ययावत करण्यात येणार आहे. लवकरच या रेल्वे स्थानकाची प्रक्रिया पूर्ण करून निविदा काढण्यात येणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रेल्वे स्थानक सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे संकेत यावेळी खा. सुनिल तटकरे यांनी व्यक्त केले. यावेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी पेण पालिका आणि पेणकर विविध संघटना यांनी रेल्वे बाबत मांडलेल्या समस्यांकडे विशेष लक्ष देऊन त्या पूर्णत्वास आणण्यात हातभार लावत आहेत याबाबत खा. सुनिल तटकरे यांचे पेणच्या प्रथम नागरिक या नात्याने आभार मानले.
पेण नगर परिषदेच्या सभागृहाला स्व.अजितदादा पवार यांचे नाव.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांना पेणमधुन पन्नास हजारांचे मताधिक्य देण्याचा शब्द आमदार रवीशेठ पाटील यांनी स्व. अजितदादा पवार यांना दिला होता. त्यांनी तो शब्द पाळल्यानंतर पेण शहराला रस्ते विकासासाठी कोणत्यावधी रुपयांचा निधी देण्याचा शब्द अजित पवार यांनी रविशेठ पाटील यांना दिला होता. दोघांनीही एकमेकांचा शब्द पाळल्यानंतर आज अजितदादा पवार आपल्यात नसल्याने त्यांच्या स्मृती जाग्या राहाव्यात याचा विचार करून पेण पालिकेने नूतनीकरण करण्यात येणाऱ्या पालिकेच्या सभागृहाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव देण्याचा ठराव घेतला आहे आणि त्याची घोषणा आज सभागृहात खा. सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
अरविंद गुरव
Special Correspondent | Do Reports
Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.
Join Do Reports WhatsApp Channel
ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा
Latest Stories

जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

Preity zinta । फक्त ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्ट घालून चालणार नाही; प्रत्यक्ष काम करा
जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

परंपरेतून आधुनिक लक्झरीकडे… SCube Salon फक्त सेवा नाही तर देतोय सौंदर्याचा अनुभव

