सशस्त्र सीमा बलातील जवानाचा सन्मान; जव्हारचा अभिमान उंचावला

नवी दिल्ली येथे करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे जव्हार तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला
जव्हार, दि.१; प्रतिनिधी
देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असलेल्या भारतीय सशस्त्र सीमा बलात (एसएसबी) सेवा बजावत असलेल्या जव्हार तालुक्यातील गणेश नगर (डबकपाडा) येथील शेतकरी कुटुंबातील जवान योगेंद्र राऊत यांच्या कार्याचा गौरव मंगळवारी केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय सेवेमुळे परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे जव्हार तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
सशस्त्र सीमा बल हे देशाच्या अंतर्गत सुरक्षेसह सीमावर्ती भागातील सुरक्षेची जबाबदारी सांभाळणारे महत्त्वाचे दल आहे. अशा जबाबदारीच्या दलात कार्यरत राहून देशसेवेचे व्रत स्वीकारणाऱ्या जवानांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. प्रतिकूल परिस्थितीतही कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या जवानांबद्दल समाजात नेहमीच आदराची भावना असते.
ग्रामीण व आदिवासीबहुल जव्हार तालुक्यातील युवकाने देशसेवेच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केल्याने स्थानिक युवकांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. कुटुंबीयांसह ग्रामस्थांनी त्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.“तुमचा हा सन्मान हा केवळ तुमचा नसून, आमच्या गावाचा, आई-वडिलांचा आणि संपूर्ण देशाचा अभिमान आहे,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. जवान योगेंद्र राऊत यांना पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार हरिश्चंद्र भोये यांनीदेखील अभिमान पर शुभेच्छा दिल्या.
संदीप साळवे
Special Correspondent | Do Reports
Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.
Join Do Reports WhatsApp Channel
ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा
Latest Stories

जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

Preity zinta । फक्त ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्ट घालून चालणार नाही; प्रत्यक्ष काम करा
जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

परंपरेतून आधुनिक लक्झरीकडे… SCube Salon फक्त सेवा नाही तर देतोय सौंदर्याचा अनुभव

