Do Reports

मनसे-शिवसेनेचे या विषयावर एकमत, सदर निर्णयाचे मनसेकडून स्वागत

Vikrant Nalawade
By Vikrant Nalawade
मनसे-शिवसेनेचे या विषयावर एकमत, सदर निर्णयाचे मनसेकडून स्वागत

डोंबिवलीतील रस्ते आधीच अरुंद असून, शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रस्त्याचा काही भाग व्यापणाऱ्या मोठ्या शुभेच्छा कमानी उभारल्याने वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.

डोंबिवली : डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांचा प्रश्न लक्षात घेता, मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर सण-उत्सवांच्या शुभेच्छा कमानी आणि भव्य फलक लावण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील यांनी केली होती. या मागणीची आता शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. डोंबिवली शहरात वाहतुकीला अडथळा ठरेल अशा पद्धतीने एकही शुभेच्छा कमान उभारू नये, अशा सूचना डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.

शिवसेनेच्या या निर्णयाचे मनसेकडून स्वागत

डोंबिवलीतील रस्ते आधीच अरुंद असून, शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात रस्त्याचा काही भाग व्यापणाऱ्या मोठ्या शुभेच्छा कमानी उभारल्याने वाहतुकीला आणखी अडथळा निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. विशेष म्हणजे, यापूर्वी डोंबिवलीतील स्थानिक राजकारणात मनसे आणि शिंदे शिवसेनेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. मात्र, आता मनसेच्या मागणीवर शिवसेनेने सकारात्मक भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांमधील बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, शहरात लाखो रुपये खर्च करून शुभेच्छा कमानी आणि फलक उभारण्यापेक्षा वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था आणि शहरातील अस्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांकडे राजकीय पक्षांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. मनसेच्या मागणीला शिवसेनेचा सकारात्मक प्रतिसाद आणि त्यानंतर मनसेकडून या निर्णयाचे झालेले स्वागत हे डोंबिवलीच्या राजकारणात हा निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

संबंधित विषय (Tags):
#mns#shivsena#hordings#topics#harshad patil#shrikant shinde
Share This Article (बातमी शेअर करा):
Vikrant Nalawade

Vikrant Nalawade

Editorial

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel