Do Reports
WelfareDo Reports

जवळेथरमध्ये ‘गणपती सजावट स्पर्धा २०२६’; ‘श्री गांगो रवळनाथ प्रसन्न’ फेसबुक पेजचा पुढाकार

DR
By Do Reports Desk
जवळेथरमध्ये ‘गणपती सजावट स्पर्धा २०२६’; ‘श्री गांगो रवळनाथ प्रसन्न’ फेसबुक पेजचा पुढाकार

गणेशोत्सवाच्या निमित्ताने गावातील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि कौटुंबिक संस्कृतीचा गौरव करण्याच्या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन

जवळेथर (प्रतिनिधी)

गणेशोत्सवाचे औचित्य साधून जवळेथर गावातील घरगुती गणेशोत्सवातील सजावटीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६ - गणपती सजावट स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘श्री गांगो रवळनाथ प्रसन्न’ या अधिकृत फेसबुक पेजच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात येत असून, केवळ जवळेथर गावातील मूळ ग्रामस्थांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ग्रामस्थांनी आपल्या घरातील श्री गणेशाच्या सजावटीचे २ ते ३ स्पष्ट आणि उच्च दर्जाचे फोटो तसेच १५ ते ३० सेकंदांचा एक छोटा व्हिडिओ पाठवायचा आहे. प्रवेशिका १४ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत पाठवता येणार आहेत.
प्रवेशिका पाठवण्यासाठी ‘श्री गांगो रवळनाथ प्रसन्न’ या अधिकृत फेसबुक पेजवर DM करता येईल किंवा ९३५९२३४६४३ या व्हॉट्सॲप क्रमांकावर फोटो आणि व्हिडिओ पाठवता येणार आहे. प्रवेशिका पाठवताना स्पर्धकाचे पूर्ण नाव, वाडीचे नाव आणि मोबाईल क्रमांक नमूद करणे बंधनकारक आहे. एका घरगुती गणपतीसाठी एकच प्रवेशिका ग्राह्य धरली जाणार आहे. सजावटीमध्ये नैसर्गिक आणि पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करणाऱ्या स्पर्धकांना विशेष गुण दिले जाणार आहेत. फुले, कागद, कापड, माती, झाडांची पाने यांसारख्या साहित्याचा वापर करण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. तसेच थर्माकोल आणि प्लास्टिकचा अतिवापर टाळणाऱ्या सजावटींना प्राधान्य दिले जाणार आहे.

सजावटीची कल्पकता, संकल्पना आणि एकूण मांडणी यावर आधारित गुणदान करण्यात येणार आहे. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम आणि सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकासाठी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय पाच उत्तेजनार्थ आकर्षक सन्मानचिन्हेही देण्यात येणार आहेत. विजेत्यांची नावे गौरी विसर्जनाच्या दिवशी ‘श्री गांगो रवळनाथ प्रसन्न’ या फेसबुक पेजवर जाहीर केली जाणार आहेत.

जवळेथर गावातील अधिकाधिक ग्रामस्थांनी आपल्या घरातील गणपती सजावटीचे फोटो आणि व्हिडिओ पाठवून या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ‘श्री गांगो रवळनाथ प्रसन्न’ https://www.facebook.com/share/1Dr7cGRSUT/ या अधिकृत फेसबुक पेजला भेट द्यावी.

संबंधित विषय (Tags):
#ganpati#festival#compition#rajapur
Share This Article (बातमी शेअर करा):
DR

Do Reports Desk

Special Correspondent | Do Reports

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel