Do Reports
WelfareDo Reports

कल्याण तालुकास्तरीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप २०२६-२७ संपन्न

Vikrant Nalawade
By Vikrant Nalawade
कल्याण तालुकास्तरीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप २०२६-२७ संपन्न

कल्याण तालुकास्तरीय स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप २०२६-२७ उत्साहात संपन्न! यावर्षी ही मोठ्या प्रमाणात स्पर्धा डोंबिवलीत पार पडली. डोंबिवलीतून राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी डान्सर्सची निवड

डोंबिवलीतील निवड स्पर्धा..
डोंबिवली


स्पोर्ट्स डान्स असोसिएशन ऑफ कल्याण तालुका हि रजिस्टर ऑरगनायझेन आहे. ज्याच्या तालुका स्तरीय, जिल्हास्तरीय, राज्य स्तरीय, राष्ट्रीय पातळीवर तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर डान्स स्पर्धा होत असतात. यावर्षीपासून कल्याण तालुका मध्ये जिल्हास्तरीय निवडीकरता तालुकास्तरीय डान्स चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित केल्या होत्या. स्पोर्ट डान्स असोसिएशन ऑफ कल्याण तालुकाची हि चॅम्पियनशिप स्पोर्ट्स डान्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, स्पोर्ट्स डान्स फेडेरेशन ऑफ इंडिया, इंटरनॅशनल स्पोर्ट्स डान्स फेडरेशन, ऐशियन स्पोर्ट्स डान्स कॉन्सिल्स यांच्या अंतर्गत आहेत. स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया कडून मान्यताप्राप्त आहे. गेल्या वर्षीच्या स्पोर्ट्स डान्स चॅम्पियनशिप मध्ये कल्याण तालुकाने राष्ट्रीयपातळीवर पाच सुवर्ण पदक जिंकले आहेत. यावर्षी ३० ऑगस्टपासून चॅम्पियनशिप सुरु होत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना प्रेसिडेंट प्रशांत आंबडसकर म्हणाले, राष्ट्रीय व राज्यस्तरीय डान्स स्पर्धेत उत्तमोत्मक डान्सरने आपली कला सादर करावी हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही मोठ्या प्रमाणात हि स्पर्धा डोंबिवलीत पार पडली.

संबंधित विषय (Tags):
#kalyan#dance#championship#dombivali
Share This Article (बातमी शेअर करा):
Vikrant Nalawade

Vikrant Nalawade

Editorial

Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.

Join Do Reports WhatsApp Channel

ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा

Join Channel