Junk Food News: जंक फूड सेवनामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात

सकाळी लवकर निघाल्यामुळे पोट भरण्यासाठी येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना स्वस्त पर्याय म्हणून जंक फूड वर अवलंबून राहावे लागते मात्र या अन्नप्रकाराच्या अधिक सेवनामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात
जव्हार, दि.३१; प्रतिनिधी
जव्हार : तालुक्याचे प्रशासकीय ठिकाण असलेले जव्हार शहरात ग्रामपंचायत व ग्रामदान मंडळातून नागरिक, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी येथे दाखल होत असतात. सकाळी लवकर निघाल्यामुळे पोट भरण्यासाठी येथील नागरिकांना व विद्यार्थ्यांना स्वस्त पर्याय म्हणून जंक फूड वर अवलंबून राहावे लागते मात्र या अन्नप्रकाराच्या अधिक सेवनामुळे चिमुकल्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, आम्लपित्त, अपचनाच्या तक्रारीत वाढ झाली असून जव्हार रुग्णालयासह खाजगी रुग्णालयातही अशी रुग्णसंख्या वाढत आहे.
कुरकुरे, चिप्स तळलेल्या पदार्थांची चटक आरोग्यावर परिणाम होत आहे. वाढीच्या वयात मुलांना पौष्टिक गरज असताना जंकफूड प्रमाण वाढल्याने आम्लपित्त (ऍसिडिटी), अपचन आणि मळमळ तक्रारी वाढत आहेत. पालक हौसेने मुलांना देत असलेले जंकफूड चिमुकल्यांसाठी त्रासदायक दिसत आहे.
लहान मुलांना पालक हौसेने कुरकुरे, चिप्स आणि तळलेले खाण्यास देतात. मात्र, ही मुले अवस्थेत असल्याने त्यांच्या विचार करून वाढीस पूरक आहार देणे आवश्यक असते. त्याकडे दुर्लक्ष करून अनेक पालक बाजारात मिळणारे मसालेदार तळलेले जंकफूड खाऊ घालत आहेत. प्रत्यक्षात मुलांना घरचे सकस अन्न देणे आवश्यक आहे. तसेच फळे, शेंगदाणे, सुकामेवा आणि घरच्या घरी तयार केलेले पौष्टिक खाद्यपदार्थ देणेही उपयुक्त ठरते. दरम्यान, सर्व शाळांमध्ये अन्नसुरक्षा प्रदर्शन फलक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या सूचनांची अंमलबजावणी शिक्षकांकडून गांभीर्याने होताना दिसत नाही.
ऍसिडिटीची मुख्य कारणे
चीज, बर्गर, चिप्स आणि तळलेले पदार्थ : या पदार्थांमध्ये चरबीचे (फॅट्स) प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते पचण्यास अधिक वेळ लागतो आणि पोटात आम्लाचे प्रमाण वाढू शकते.
कार्बोनेटेड आणि गोड पेये : कोल्ड्रिंक्स आणि पॅकबंद ज्यूसमध्ये सायट्रिक ऍसिड तसेच कार्बन डायऑक्साइड असतो. त्यामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण वाढू शकते.
फायबरची कमतरता : जंकफूडमध्ये तंतुमय पदार्थांचे (फायबर) प्रमाण कमी असते. त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावून बद्धकोष्ठता होऊ शकते आणि परिणामी ऍसिडिटीचा त्रास वाढू शकतो.
चायनीज पदार्थ, कुरकुरे, चिप्स यांसारखे पदार्थ पॅकिंगमध्ये दीर्घकाळ साठवलेले असतात. त्याचा लहान मुलांच्या पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. परिणामी पोटदुखीच्या तक्रारी लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहेत.
डॉ. उमेश पाटील, वैद्यकीय अधीक्षक, पतंग शाह उपजिल्हा रुग्णालय जव्हार
संदीप साळवे
Special Correspondent | Do Reports
Do Reports न्यूज डेस्कवरील पत्रकार.
Join Do Reports WhatsApp Channel
ताज्या बातम्या थेट तुमच्या WhatsApp वर मिळवा
Latest Stories

जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

Preity zinta । फक्त ‘टीम तुकाराम मुंढे’ टी-शर्ट घालून चालणार नाही; प्रत्यक्ष काम करा
जल्लोषात पार पडली ‘जवळेथर गणेशोत्सव २०२६’ अंतर्गत गणपती सजावट स्पर्धा; भव्य बक्षीस वितरण सोहळ्याने सांगता!

सार्वजनिक रस्त्यांवर फटाके फोडण्यास बंदी; मिरवणुकांमधील ध्वनिप्रदूषणावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश

28 ते 30 सप्टेंबर बँक कर्मचाऱ्यांचा संप? सरकारकडून संप मागे घेण्याचे आवाहन; ग्राहकांवर सलग 5 दिवस परिणामाची शक्यता

परंपरेतून आधुनिक लक्झरीकडे… SCube Salon फक्त सेवा नाही तर देतोय सौंदर्याचा अनुभव

